अर्जुन कराळे शेगाव
खामगाव,दि.18
आगामी वर्षात येणा-या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मतदारामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तहसिल कार्यालय खामगांव च्या वतीने सुटाळा बु. ग्रामपंचायत चुनाव पाठशाळा चे आयोजन करण्यात आले.
चुनाव पाठशाळा या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सुटाळा बु. ग्रामपंचायतच्या सरपंच सुलोचनाताई वानखडे हया होत्या तसेच सदर कार्याक्रमाला ०२६ – खामगांव विधानसभा मतदार संघ, मतदार नोंदणी अधिकारी तथा मा. उपविभागीय अधिकारी खामगांव तसेच ०२६-खामगांव विधानसभा मतदार संघ, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार खामगांव यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येणा-या स्विप म्हणजेच मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ०२६ – खामगांव विधानसभा मतदार संघात चुनाव पाठशाळा या अनोख्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात ०२६ खामगाव मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी स्थानिक लोकांना निवडणुकीबद्दल व मतदानाबद्दल मार्गदर्शन केले त्यांनी १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांची नाव नोंदणी तसेच मयत व स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे, मतदान ओळखपत्राला आधारशी संलग्न करणे याबाबत आवाहन केले. तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार खामगांव श्री अतुल पाटोळे यांनी मतदार यादी शुध्दीकरण करण्याबाबत व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मार्गदर्शन केले.
मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचे शुध्दीकरण करण्यासाठी निवडणुक आयोगामार्फत आयोजीत करण्यात येणा-या विविध कालबद्ध कार्यक्रमांमधील एक भाग म्हणुन सुटाळा बु. येथे चुनाव पाठशाळेचे आयोजन करण्यात आले असे सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा खामगाव तहसीलदार अतुल पाटोळे यांनी कळविले.