गोदिंया-शैलेश राजनकर
गोंदिया,दि.19 : बिरसी विमानतळावर सुरक्षारक्षक म्हणून गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कारण नसताना कमी करण्यात आले.
त्यामुळे आपल्याला नोकरीवर पुन्हा घेण्यात यावे किंवा आमची जमीन परत करण्यात यावी, यासाठी विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आंदोलनात कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि मुले देखील सहभागी झाले.
बिरसी येथील विमानतळाचा विकास करण्यात आला. त्याची 2007 पासून सुरूवात करण्यात आली.
याठिकाणी स्थानिक नागरिकांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात आले. ते सुरक्षा रक्षक आत्तापर्यंत कार्यरत होते. 13 वर्षे त्यांनी इमानेइतबारे नोकरी केली.
त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण यावरच अवलंबून आहे. मात्र आता विमानतळ प्रशासनाने डीजीआर परिपत्रक 1994 अंतर्गत सेवानिवृत्त सैनिकांना घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही बातमी वर क्लिक करा
https://www.suryamarathinews.com/post/8131
डीजीआर परिपत्रकाचा आधार घेत स्थानिक सुरक्षा रक्षकांना काढून सेवानिवृत्त सैनिकांना घेण्यात येणार आहे. स्थानिकांना नोकरीचे आमिष देवून त्यांची जागा हस्तगत केली.
मात्र आता त्यांना नोकरीवरून काढून अन्याय करत आहे. आपल्याला कामावर पूर्ववत घेण्यात यावे किंवा आपली जागा परत देण्यात यावी,
या मागणीला घेवून सुरक्षा रक्षकांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली.
विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेल्या आंदोलनात सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांसह तान्हुले मुले देखील सहभागी झाले आहेत.
जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.