गजानन सोनटक्के
जळगांव जा.
जळगाव जामोद तालुक्यातील उसरा येथे दिनांक 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीवरून एका कुटुंबाने श्रीकृष्ण हरिभाऊ शिंबरे यांच्या पॅनल ला मतदान केले नाही म्हणून वाद करीत पंधरा जणांनी विरोधकांच्या घरात घुसून तलवार कुराड, फावडे,लाठ्या- काठ्यांनी हल्ला केला यामध्ये शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील यांच्यासह सहा जण गंभीर जखमी झाले तसेच यामध्ये दत्ता पाटील यांची पन्नास ग्राम सोन्याची चेन हिसकावली याप्रकरणी 15 जणांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस गुन्हे दाखल केले आहेत सविस्तर असे की जळगाव जामोद तालुक्यातील उसरा येथील अनिकेत उमेश पाटील, आशिष पंढरी घाईट, शुभम दत्तात्रय घाईट, वैभव पंढरी घाईट,उमेश राजकुमार घाईट हे 15 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास अनिकेत पाटील यांच्या घरासमोर उभे असताना शिंबरे कुटुंबाने तेथे येऊन त्यांना असे म्हटले की तुम्ही आमच्या पँनलला मतदान का करत नाहीत असे म्हणून शिवीगाळ केली तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून निघून गेले तसेच संध्याकाळी साडेसहा ते सात सातच्या सुमारास दत्ता पाटील यांच्यासह सर्वजण घरात बसलेले असताना श्रीकृष्ण हरिभाऊ शिंबरे,प्रमोद उर्फ बाळु शिंबरे,श्रीकांत श्रीकृष्ण शिंबरे, धनंजय शिंबरे, चेतन शिंबरे, यश प्रमोद शिंबरे, शालिनी श्रीकृष्ण शिंबरे, निता प्रमोद शिंबरे, कल्पना धनंजय शिंबरे, कांचन श्रीकांत शिंबरे व इतर पाच जणांनी तिथे येऊन हातात तलवार,कुराड,फावडे, लाठ्या-काठ्या घेऊन मतदानाच्या कारणावरून वाद करीत हल्ला केला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता पाटील यांच्या डोक्यावर तलवारीने वार केला यामध्ये दत्ता पाटील हे गंभीर जखमी झाले या गंभीर अवस्थेमध्ये त्यांच्या गळ्यातील 50 ग्रॅम सोन्याची चैन हिसकावत चेतन शिंबरे यांनी सोन्याची चैन लंपास केली. तर या हाणामारी मध्ये राजकुमार पाटील उमेश पाटील,पंढरी घाईट, यांना फावडे व कुराडीने जबर मारहाण केली. यावेळी वाचवण्याकरिता आलेल्या महिलेसोबत उपरोक्त आरोपींनी तिची छेडछाड केली. या हाणामारी मध्ये दत्ता पाटील यांच्यासह त्यांना तात्काळ उपचारासाठी खामगाव येथील सिल्वर सिटी येथे हलविण्यात आले या सर्व प्रकाराची तक्रार अनिकेत पाटील यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी श्रीकृष्ण हरिभाऊ शिंबरे, प्रमोद उर्फ बाळू शिंबरे, श्रीकांत शिंबरे,धनंजय शिंबरे, चेतन शिंबरे, यश शिंबरे, शालीनी शिंबरे, निता शिंबरे,कल्पना शिंबरे,कांचन शिंबरे यांच्यासह इतर पाच जणांवर कलम 307,397,398,452,354,354ब,143,144,148,149,294,506,135, भादवि नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय सतीश आडे व विकास गव्हाड करीत आहे