गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील शेतकरी यांनी तक्रारीत म्हटले की त्यांनी उसरा बु शिवारात गट नं 75 13 14 व सूनगाव भाग 2 मधील 791 शेतात राशी कंपनीचे 659 हे कपाशीचे वाण पेरणी केली परंतु बियाणे पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे आज रोजी कपाशीच्या झाडांना कमी प्रमाणात बोंडे लागली व काही झाडांना तर बोंडे लागलीच नाही व लागलेल्या बोडांना सुरवातीपासूनच कीड लागलेली आहे व मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे या वर्षी आधीच संकटात सापडलेल्या अवस्थेत शेतकरी असताना अशा परिस्थितीत राशी कंपनीचे 659 वान पेरून उत्पन्न न झाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे व कंपनीने बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केली आहे तरी आपण सदर शेताची पाहणी करून पंचनामा करून कंपनीवर कायदेशीर कारवाई ची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांचा झालेला खर्च व उत्पादन खर्च त्याचा मोबदला शेतकर्यांना देण्यात यावा अशा आशयाची तक्रार दिली आहे व तक्रारीची प्रतिलिपी तहसीलदार जळगाव जामोद यांना दिली आहे तक्रारीवर गजानन सोनटक्के सुरेश ढगे प्रमोद राऊत सुमित्राबाई राजपूत आदिच्या सह्या आहेत