सेनगाव शहरातील पशुवैद्यकीय उपकेंद्रात घाणीचे साम्राज्य.

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

सेनगाव: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात असलेल्या पशुवैद्यकीय उपकेंद्रात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून पशुपालक त्रास होत आहे. सध्या सुरू असलेला लंपी स्किन हा जनावरांचा रोग खूप कसरत असल्यामुळे या केंद्रात पशुपालक व जनावरे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या केंद्रात पाणी साचल्यामुळे जनावरांना व पशुपालकांना सुरक्षित उभे राहता येत नाही व तसेच त्या पाण्यातून आतमध्ये जावे लागत आहे‌. या केंद्रात बरेचसे गावे येत असल्यामुळे येथे लंपी स्किन या आजाराने गर्दी वाढत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष असून लवकरात लवकर हा प्रश्न दूर करावा अशी मागणी बऱ्याचशा पशुपालकांकडून केली जात आहे.

Leave a Comment