Home बुलढाणा सेन्ट्रल बँक शाखाधिकारी श्री धीरज पाटील यांना गावकऱ्यांनी दिला निरोप समारंभ

सेन्ट्रल बँक शाखाधिकारी श्री धीरज पाटील यांना गावकऱ्यांनी दिला निरोप समारंभ

696
0

 

पातुर्डा येथील सेन्ट्रल बँक ला 3 वर्षांपूर्वी ग्रामीण भाग म्हणून बँक मॅनेजर पदावर श्री धीरज पाटील यांची नियुक्ती झाली होती आज त्याच्या कार्यकिर्द ला 3 वर्ष झाल्यामुळे त्याची बदली जळगाव खांदेश येथील रिजन मध्ये शहरी भागात होऊन पदोन्नती मिळाली आहे,त्यांना पातुर्डा येथील गावकरी मिळून निरोप समारंभ देण्यात आला
सेन्ट्रल बँक चे कर्मचारी श्री चौधरी साहेब,कृषी अधिकारी विलास टेभरे साहेब,उखळी ब्रांच चे शाखाव्यवस्थापक व उपशाखाव्यवस्थापक यांच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला,नेकनामपूर येथील पोलीस पाटील प्रशांत चोपडे,ता अध्यक्ष भाजप लोकेश राठी, माजी उपसरपंच निलेश चांडक, अविनाश धर्माळ, विनायक चोपडे, श्रीकृष्ण खोंड, सुखदेव बावस्कर,न्यानेश्वर तायडे,श्याम देशमुख, कृष्णा भुतडा,लतीश भूतडा, पवन खंडेराव,सचिन राहाटे, कैलास डबाळे, नितीन क्षीरसागर, गणेश राठी, घनश्याम चांडक,अमित भोंगळ,गणेश राहाटे, रवी दामधर,विलास इंगळे,सैय्यद लियाकत,उमेश सुरडकार,प्रमोद मावळे,दीपक बोचरे यांनी बँक मॅनेजर श्री धीरज पाटील यांचा शाल,श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व या नंतर साहेबांच्या पातुर्डा येथील 3 वर्षांच्या कार्यकिर्दीवर श्री प्रशांत चोपडे,श्री निलेश चांडक,श्री लोकेश राठी यांनी भाषण दिले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.श्री धीरज पाटील यांनी 3 वर्षात या गावाला व परिसरातील गावाला आपले मानून काम केले जमे पर्यंत कोणाचेही काम रुकु नाही दिले आणि जास्तीत जास्त युवकांना मार्गदर्शन दिले व ज्यांना गरज आहे त्यांना प्रांतप्रधान यांची मुद्रा योजना देऊन सहकार्य केले

Previous articleप्रधानमंत्री आवास योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा खासदार प्रतापराव जाधव प्रधानमंत्री आवास योजना आढावा बैठक
Next articleओला दुष्काळ’ जाहीर करुन,शेतकऱ्यांना आर्थीक मदत करा ; वसंतराव वानखेडे वंचित बहुजन आघाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here