Home अकोला सोनु चौक अकोट येथील मरीमाता मंदिर परिसरातील प्रस्तावित मुत्री घर बाधंकाम रद्द...

सोनु चौक अकोट येथील मरीमाता मंदिर परिसरातील प्रस्तावित मुत्री घर बाधंकाम रद्द करण्याबाबत निवेदन..

259
0

 

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे

आजअकोट शहरातशिवसेना,विश्व हिंदु परिषद,बजरंग दल शाखा अकोटयांच्या वतिने अकोट शहर स्थित सोनू चौक येथील मरिमाता मंदिर परिसरात प्रस्तावित मुत्रीघर बांधकाम रद्द करण्याबाबत अकोट तहसीलदार,अकोट शहर पोलीस निरीक्षक तसेच नगरपालिका कार्यालय अकोट यांना निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील सोनु चौक भागात अकोट नगर परिषद द्वारा मरीमाता मंदिर परिसरातील प्रस्तावित मुत्री बाधंकाम करण्यात येत आहे.सदर मुत्रीघर बाधंकाम हे मंदिरापासुन काही फुटावर प्रस्तावित आहे तसेच सोनुचौक हे अत्यंत गजबजलेली बाजारपेठ असुन प्रस्तावित मुत्री घराला लागुन पोस्ट ऑफीस काॅलनी आहे.या मुत्रीघराचे आऊटलेट नाली त्यामुळं हे नाली मंदिरासमोरून जाते.ज्यामुळे या सार्वजनिक मुत्री घरामुळे याभागात मोठ्या प्रमाणात दुर्गधी पसरू शकते व भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
सदर मुख्य रस्ता हा गजानन महाराज मंदीराकडे जातो या रस्त्यावर अतिक्रमण पुन्हा होवु देऊ नये,हातगाडी फेरीवाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथडा निर्माण होत आहे त्यांना या ठिकाणी बसु देवु नये.सदर परिसरात मुत्रीघर हे आवश्यक आहेच पण दुसऱ्या जागी वळते करावे.या मंदिर परिसरात जर मुत्री घर होत असेल तर आमच्या धार्मिक भावना आहत होत असुन आमच्या भावनाचा आदर करून या परीसरातील प्रस्तावित मुत्री घर हे १५ दिवसात इतर ठिकाणी वळते करावे अशा प्रकारे विंनती या निवेदनातुन करण्यात आली आहे.असे न झाल्यास आम्ही शिवसेना,विश्व हिंदु परिषद व बजरंग दल शाखा अकोटच्या वतीने लोकशाही पद्धतीने अकोट नगर परिषद विरूद्ध आंदोलन छेडु व त्यावरून उद्भवणाऱ्या परिस्थितीस अकोट नगर परिषद मुख्याधिकारी नगराध्यक्ष तथा बांधकाम विभाग जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी शिवसेना गटनेते नगरसेवक मनीष रामाभाऊ कराळे,विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्यकारणी सदस्य गजानन माकोडे,प्रकाश मंगवानी,पप्पू कैसर,परमानंद डोडवाणी,नरेश पारवाणी,सुनील गुप्ता,गोपाल काळे,जगदीश दातीर,विजय पळघाण,प्रवीण बोर्डे,सागर कराळे,बंडू चव्हाण,शिवा टेमझरे इत्यादी सह शिवसैनिक,विश्व हिंदू परिषद,बजरंग दल चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleआमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर*यांच्या विशेष प्रयत्नाने गावातील मंदीर परिसरात “2515 अंतर्गत 5 लक्ष रुपये मंजूर” केलेल्या पेव्हर ब्लॉक कामांचे भूमिपूजन
Next articleजळगाव जामोद येथे समाज कल्याण विभागा मार्फत 100 % अनुदानावर गटई स्टॉल वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here