आम्ही सर्व शेतकरी मोजे जस्तगाव ता. तेल्हारा जी.अकोला येथील रहीवासी असुन आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन देतो की शेतकरीने कर्ज व सोने गव्हाण ठेवुन सोयाबिनचा पेरा केलेला आहे व सदर पिकाचा विमा सुध्दा काढलेला आहे पण सततच्या पाऊसामुळे अतोनात नुकसान झाले व एन वेळेवर बहारावरच पाण्याने मुसंडी मारल्यामुळे ज्या झांडाना भरघोष सेंगा यायला हव्या ते झाड मात्र वांझोटेच राहीले या मुळे शेतकरी कासावीस झाले आम्ही शेतकरी चे सोयाबीनचे पीक हेच मुख्य आहे आमची वार्षीक आर्थीक परीस्थीती हे याच पीकावर अवलंबुन आहे म्हनुण हा पिक वीमा त्वरीत मंजुर करण्यात यावा ही विनंती अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्या शिवाय पर्याय राहणार नाही. यावेळेस गावातील सेर्व शेतकंरीचे निवेदनावर स्वाक्षरी आहेत व नीवेदन देतेवेळी डाॅ. किशोर जवंजाळ , निलेश जवंजाळ, गोपाल जवंजाळ ,गजानन पुंडे, रवी जवंजाळ,गोपाल कवळे ,नीतीन गावंडे, व लोकजागर मंचचे तालुकाअध्यक्ष अमोल दि.जवंजाळ होते