Home Breaking News स्कार्पिओ ची धडक दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार.. स्कार्पियो चालक फरार शेगाव खामगाव रोडवरील...

स्कार्पिओ ची धडक दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार.. स्कार्पियो चालक फरार शेगाव खामगाव रोडवरील माऊली कॉलेज जवळ मध्यरात्रीची घटना

995
0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव: काल मध्यरात्री खामगाव कडून शेगाव कडे येणाऱ्या दुचाकीला स्कार्पियो ची धडक लागून दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार झाल्याची घटना 28 ऑक्टोंबर रोजी रात्री घडली याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव येथील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या मरी भान हिरामण बावणे लखन मरी भान बावणे व शेख रज्जाक शेख रहमान हे तिघे दुचाकी क्रमांक एम एच 28 AU 72 65 ने 28 ऑक्टोंबर च्या रात्री खामगाव कडून शेगाव कडे येत होते कनारखेड जवळील माऊली कॉलेज जवळ विरुद्ध बाजूने येणाऱ्या स्कार्पिओ क्रमांक mh-15bn 33 49 ची जोरदार धडक लागली या धडकेत मरीभान हिरामण बावणे व लखन मरीभान बावणे राहणार शिवाजी नगर शेगाव हे दोघे ठार झाले तर शेख रज्जाक शेख रहमान वय 55 राहनार बालाजी फैल शेगाव हे गंभीर रित्या जखमी झाले सदर अपघाताची माहिती खामगाव शेगाव रोडवर पेट्रोलिंग करीत असलेल्या ग्रामीण पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी ॲम्बुलन्स मध्ये स्थानिक सईबाई मोटे रुग्णालयात आणले असता तेथे ड्युटीवरील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेख रज्जाक याला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच खामगाव येथील पोलिस उपविभागीय अधिकारी व शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली अपघातानंतर स्कार्पिओ चालक घटनेवरून घटनास्थळावरून फरार झाला.

Previous articleस्वस्थ धान्य दुकानामध्ये सडक्या मक्याचे वितरण पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार …
Next articleवैजापूर तालुक्यातील २२.६८ कि. मी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here