इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव | स्थानिक श्रीकृष्ण नगर परिसरातून २६ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग रिपोर्ट दर्ज करण्यात आला आहे
याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहरात एका खाजगी प्रतिष्ठान येथे कामावर असलेल्या सौ. स्वाती उर्फ लक्ष्मी रामदास जवंजाळ ही विवहिता १८ सप्टेंबर रोजी कामावर जाते असे सांगून घरून निघुन गेली.
उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटूंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही. याबाबत विवाहितेच्या आईने शेगाव शहर पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे.