सिंदी : ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाला सिंदीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंदी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ, सुंदर, निर्मल व आरोग्यदायी गावे निर्माण होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही ”सेवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘एक तास एक साथ’ स्वच्छतेसाठी श्रमदान ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला सिंदी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विविध ठिकाणी लोकप्रतिनिधींसह, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांचे यावेळी हात राबत या श्रमदानातून बापूंना जयंतीनिमित्त स्वरांजली वाहण्यात आली. सर्वप्रथम उपस्थितांनी सकाळी ९.३० वाजता स्वच्छतेची शपथ प प्रतिज्ञा घेतली.
त्यानंतर सकाळी १० ते ११ या वेळेत सिंदी शहरातील बस स्टँड आणि मैन मार्केट परिसर येथे श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमाला नगर परिषद सिंदीचे मुख्याधिकारी श्री. मधुकर ठाकरे आणि सर्व अधिकारी व कर्मचारी, बचत गटातील महिला व नगर परिषद शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
मुख्याधिकारी श्री. मधुकर ठाकरे यांनी स्वच्छतेविषयी जनजागृती केली. सर्वांच्या उपस्थितीत महात्मा गांधी व शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला हारार्पण करून स्वच्छतेचा संदेश दिला.