प्रतिनिधी:(जालना)दि,09/01/2023 रोजी आम्ही शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना पुरस्कृत स्वतंत्र भारत पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भाऊ घनवट,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदादा पाटील बाहळे,स्वतंत्र भारत पार्टी चे अध्यक्ष मधुसूदन हरणे,सिमाताई नरोडे अध्यक्ष महिला आघाडी स्वतंत्र भारत पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत निवेदनाद्वारे केन्द्र सरकारला ईशारा देण्यात आला.या निवेदनाद्वारे असे म्हटले आहे की,
१.सरकार नी सेबी कार्यालया मार्फत दि,20 डिसेंबर 2022 ला पुन्हा एकदा वर्षे भराची मुदत वाढ करून वायदे बाझारावर जी बंदी घातली ती बंदी तात्काळ उठविण्यात यावी.
२.कापुस सोयाबीन व इतर सात पिकावरील जी वायदे बाजारात बंदी घातल्यामुळे कापसाच्या व सोयाबीन च्या भावत घसरण झाली याचे कारण फक्त सरकार चे चुकीचे धोरण म्हणून ते धोरण तात्काळ बदलविण्यात यावे.
३.तुम्ही जे सोयाबीन पेंड व डि.ओ.सी.कापसाचे सुत जे आयात करायचे धोरण राबवले.
४.निर्यात बंदी चे धोरण राबविले ते धोरण तात्काळ बंद करण्यात यावे.नसता येत्या दि,23 जानेवारी 2023 ला जालना जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने शेतकरी सेबीचे कार्यालय बांद्रा कुर्ला मुंबई येथे धडक देणार आहे.याची आत्ताच राज्य सरकारने व केन्द्र सरकारने दखल घ्यावी नसता राज्य सरकार व केंद्र सरकार चा निषेध करून सेबी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करू आशी सविस्तर माहिती शेतकरी संघटनेचे नेते गजानन पाटील भांडवले यानी दिली.यावेळी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी मा,बाबुरावजी गोल्डे ,विश्वंभर भानुशे,डॉ.कदम नितीन देशमुख,पुंजाराम सुंरूग, ऊतम काळे,हनुमान आरसुळ,संतोष खराबे,महादेव काकडे,जेगन महाराज नरोडे,विष्णु शिंदे,दिपक आंनदे, तात्यासाहेब भानुसे,आप्पा चोखनफळे,संताराम राजबिंडे, लक्ष्मण कावळे, नागोराव कापशे, व ईत्यादी कार्य करते उपस्थितीत होते