स्वस्त धान्य दुकानाचा परवाना जिल्हाधिकारी यांनी तात्काळ रद्द करावा : काँग्रेस स्वस्त धान्य कमेटीची मागणी

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील भालोद येथील एका स्वस्त धान्य दुकान चालकाचा मनमानी कारभार लाभार्थ्यांना धान्य न देता शिवीगाळ धमकण्याचा प्रकार स्वस्त धान्य समितीच्या जिल्हा अध्यक्ष चंद्रकला इंगळे यांनी केली तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्याकडे कारवाईची मागणी केली असुन संबधीत स्वस्त धान्य दुकानाचा परवाना तात्काळ रद्द करण्यात

याबाबत महसुल प्रशासनाच्या वतीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे. यावल तालुक्यातील भालोद येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ७३ही भालोद कल्पना अनिल भालेराव यांच्या मालकीची असून संजय भालेराव हे या दुकानास भाड्याने चालवता मात्र ते परिसरातील शिधापत्रीका धारक लाभार्थ्यांना धान्य देत नसल्याच्या तक्रारी असुन ,

उलट पक्षी धान्य घ्याला येणाऱ्या लाभार्थ्यांना धान्य न देता धमकी व दमदाटी करून मनमानी कारभाराने दुकान चालवतात, लाभार्थ्यांना धान्य न देता त्या धान्याला काळ्या बाजारात विकतात संजय भालेराव या भाडोत्री स्वस्त धान्य दुकान मालकाच्या भ्रष्ठ कारभाराने अनेक लाभार्थींना आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे

. कल्पना अनिल भालेराव यांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या भोंगळ कारभाराची त्वरीत प्रशासनाकडून चौकशी होऊन त्यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेसच्या स्वस्त धान्य कमिटी जिल्हा अध्यक्षा चंद्रकला इंगळे , युवक काँग्रेसचे रावेर विधान क्षेत्र प्रमुख फैजान शाह ,यावल शहर काँग्रेसचे अध्यक्ष कदीर खान,शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्यासह असंख्य लाभार्थी यांनी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली असुन , संबधित स्वस्त धान्य दुकानदारावर परवाना रद्द करण्याची कारवाई न झाल्यास कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा चंद्रकला इंगळे यांनी दिला आहे.

Leave a Comment