स्वामी विवेकानंद नगरपालिका शाळा क्रमांक पाच जवळ दुचाकी वाहनावर विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमाला शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव शहर पोलिसांनी स्वामी विवेकानंद नगरपालिका शाळा क्रमांक पाच येथे नाकाबंदी करून दुचाकीने अवैध विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे

याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलीस स्टेशन येथील कर्तव्यदक्ष डी वाय एस पी विवेक पाटील दबंग ठाणेदार पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक गजानन बाबाराव गीते बक्कल नंबर 653 पोलीस कॉन्स्टेबल संतोष डबे नंबर 25 89 हे आज एक जुलै रोजी दुपारच्या दरम्यान शहरात पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी गुप्त खबर्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली

की एक इसम मोटार सायकल वर पिवळया रंगाच्या पोतडी मध्ये नगरपालिका शाळा क्रमांक ०५ च्या दिशेने विनापरवाना अवैधरित्या देशी दारु ची विक्री करीता घेवुन जात आहे. या मिळालेल्या माहितीवरून पोनि सा विलस पाटील साहेब, पोका संतोष डब्बे बनं २५८९ असे आम्ही सरकारी शाळा क्र. ०५ येथे नाकाबंदी केली असता एक इसम मोटार सायकलवर येताना दिसला

त्यास थांबण्याचा इशारा करुन नाव गाव विचारले त्याचे नाव गांव प्रविण अरुण गवई वय २८ वर्ष रा गायगाव खु.,पोस्टे चिचोली कारफामा शेगांव जि. बुलढाणा असे सांगीतले त्याचे मोटार सायकल वर समोरून ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या पोतडीची पंचासमक्ष पाहणी केली असता त्या पिवळ्या रंगाच्या पोतडीत ४७ नग देशी दारु टंगोपंच कंपनी सिलबंद ९० ml प्लॉस्टीक शिश्या प्रती शिशो कि. ३५/- रु एकूण १६४५/- रुपये, देशी दारु १० नग बाँबी संत्रा कंपनी सिलबंद ९० ml प्लॉस्टीक शिश्या प्रती शिशी किं ३५/- एकुण ३५०/-, देशी दारु ३७ नग संत्रा ५०००/- कंपनी सिलबंद ९० ml प्लॉस्टीक शिश्वा प्रती शिशी कि ३५/- एकूण १२९५/-, एक पोतडी अ कि. ००:००/- रु. असा एकूण ३२९०/- रुचा माल व मोटार सायकल होन्डा कंपनीची स्पेलडर प्लस काळे पट्टे असलेली MH-२८-BF-४५३६ अं किं. ४०,०००/- असा एकूण ४३,२०९/- रु चा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.

याबाबत पोलीस नायक गजानन बाबाराव गीते बकल नंबर 653 यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कलम ६५ (अ). (ई) मदाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Comment