सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
बुलडाणा तालुक्यातील हतेडी बु येथे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सुरवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विक्राम जाधव हे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सचिनखरे , झिने सर हे होते. याने यावेळी बोलतांना प्रा. सचिन खरे यांनी संविधान निर्मिती मागील बाबासाहेबांची भूमिका व संविधान निर्माण करत असतांना बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाची व कष्टाची जाणीव करून देवून प्रत्येक नागरीकांनी संविधानीक मुल्यांची जोपासना करावी.व संविधानाचे पालन करावे असे प्रतिपादन केले.तर झिने सरांनी संविधानाचे महत्व विशद करुन संविधानाची प्रस्ताविका समजून सांगीतली .यावेळी ज्ञानेश्वर जाधव , साहिल जाधव यांनी सुद्धा आपले विचार मांडले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनिल झिने यांनी केले . यावेळी कार्यक्रमाला बहुसंख्य महीलांची उपस्थीती होती.