हरविलेल्या मुलीचा घेतला शेगांव शहर पोलीसांनी शोध व दिले तिला तीच्या पालकांचे ताब्यात.

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक ३०/०६/२०२३ रोजी भावीक भक्त सौ प्रियंका सचिन मसने वय 35 वर्षे राहणार नागपूर हे संत श्री गजानन महाराज यांचे दर्शना करीता त्यांची मुलगी कुमारी आराध्या वय 7 वर्षे हिचेसह आले असता श्री. गजानन महाराज मंदिर परीसरात भाविक भक्तांचे वर्दळीत त्यांची 7 वर्षांची मुलगी कुठेतरी हरवीली.

तेव्हा त्यांनी लगेच मुलीचा शोध घेण्यासाठी बंदोबस्तात हजर असलेले पोलिसांना गाठले असता पोलीसांनी मुलीचे शोध कार्यवाहीसाठी कार्यतत्परता दाखवुन मुलीचा शोध करीता सतत लाऊडस्पीकर वर अनाऊन्समेंट केली व मुलीचा शोध घेऊन तिला तिचे आईचे ताब्यात दिले. वरून त्यांनी पोलिसांचे मन:पुर्वक आभार मानले.

तरी सद्यस्थीतीत मो.सा. चोरी, सोन्याचे पोथ, गळ्यातील दाग दागीने, पाकीट मारी, मोटार सायकल चोरी व लहान मुले मुली हरविण्याचे, पळविण्याचे प्रकार पाहता श्री. संत गजानन महाराज मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना आव्हाहन करण्यात येते की, दर्शनाकरीता येत असतांना आपले लहान मुला मुलींचा काळजीपुर्वक संभाळ करुन आपले दाग दागीने, पाकीट, पर्स, मोटार सायकल, मौल्यवान वस्तु चोरी किंवा लुट होणार नाही

या दृष्टीने सुरक्षीततेबाबत खबरदारी घ्यावी, आपणासोबत अशी कुठलीही दुर्घटणा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Leave a Comment