हाथरस प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा… प्रशांत तायडे यांनी काळ्या फिती बांधून दिले तहसीलदारांना निवेदन.

 

जळगाव जामोद:-आज दि.५ सप्टेबर रोजी आर.पी.आय.गवई गटाचे बुलढाणा युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे यांच्या नेतृत्वात हाथरस मधील पिडितेला न्याय मिळावा यासाठि काळ्या फित बांधून तहसीलदार मगर साहेब यांच्या मार्फत महामहिम राष्टपती यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
देशामधे बलत्काराच्या घटनात लाक्षणिक वाढ होत आहे. उत्तर प्रदेश मध्ये नुकतेच वाल्मिकी समुदायाच्या दलित मुलि वरती पाशवी अत्याचार करुन, तीला संपविण्यात आले, जिवंतपनीच यम यातना देवून मारणा-या त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.तसेच सदर प्रकरणाची निपक्ष्य उच्चस्तरीय चौकशी गठीत करुण सदर खटला हा जलद गती (फास्टट्रॅक) न्यायालयाअंतर्ग्त चालवुन पिडीत दलित कुंटुबास न्याय द्यावा. तसेच पिडितेचा दाहअग्नी अंतसंस्कार रातोरात उरकून तपास यंत्रणेतील पुरावे नष्ट करण्याचा हा प्रकार आहे पिडितेच्या दाहअग्नी संस्कारचा आधिकार हा पिडितेच्या कुटुंबाचा असताना पोलिसानी तो स्वताहा करुन मानव अधिकाराचे हनन केले आहे.धनदांडग्यां नट्यांना पाठीशी घालणाऱ्या महिला आयोगाने हाथरस प्रकरणात एवढा उशिर का केला,हा सुद्धा चींतनाचा विषय आहे. या सर्व प्रकरणात जेही आधिकारी आरोपी व आरोपिला सहकार्य करणारे पिडित कुटुबाच्या मानवी हक्काच हनन करणाऱ्या DM, SDM व पोलिस आधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी यांना तात्काळ निलबित करुन त्यांच्यावर दंडात्मक कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी प्रशांत तायडे, गोपाल अवचार, भास्कर भटकर,सदाशिव गवई, संजय वानखडे,अमोल चोपडे, प्रभाकर वानखडे, प्रफ्फुल तायडे, मोहन चोपडे,अँड सिद्धार्थ वानखडे, हे सर्वउपस्थित होते.

Leave a Comment