हिंगणघाट आश्रय शहरी बेघर निवारा येथे जागतिक बेघर दिन सप्ताह साजरा

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट —
दि.10 ऑक्टोंबर
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत प्रेरणा वस्ती स्तर संघ संस्था द्वारा चालविण्यात येणाऱ्या आश्रय शहरी बेघर निवारा कमला नेहरू शाळा हिंगणघाट येथे जागतिक बेघर दिन सप्ताह साजरा करण्यात आला त्यामध्ये संस्था चालकांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. शहरातील मुख्य ठिकाणी जाऊन बेघर शोधणे निवऱ्यातील बेघराचे पुनर्वसन करणे निवाऱ्यामध्ये रांगोळी स्पर्धा परीक्षा घेणे निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले जागतिक बेघर दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवारा चालकांनी मा, मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, रोटरी क्लब अध्यक्ष पराग कोचर,डॉ.मुखी ,नारायण सेवा मित्र परिवारातर्फे अग्रवाल सर, विपिन सर ,शैक्षणिक संस्थेचे शीलाताई बोरकर मॅडम ,नांदे सर, सांगोळे सर ,सीमा मेश्राम ,राजश्री बांबोळे ,समाजसेवक दिनेश वर्मा, वृक्षारोपण मित्रपरिवार तर्फे नितीन क्षीरसागर, नगरसेवक मनीष देवळे ,सतीश धोबे कार्यक्रमाला उपस्थित होते. मान्यवरांना फुल झाड देऊन स्वागत करण्यात आले. नगरपरिषद हिंगणघाट एन-यु- एल-एम विभागातर्फे श्रीमती सुजाता जावळे मॅडम, इंदुरकर मॅडम,कटारिया मॅडम , सिलेब- सी-एल-एफ अध्यक्ष अनुताई मानकर व संस्था अध्यक्ष शारदा भाले व ए एल एफ ची संपूर्ण कार्यकारणी तसेच बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या .

Leave a Comment