रा. कॉ. पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदद मिळण्याची तहसीलदारांकडे केली मागणी …
हिंगणघाट :- मलक मो नईम तालुक्यातील दारोडा येथील शेतकरी मधुकरावजी घवघवे यांच्या शेतात दोन बैंलाना करंट लागून मृत्यु झाल्याने शेतकऱ्यांचे दोन लाखाचे नुकसान झाले.याप्रसंगी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या नेतृत्वात तहसीलदार सतीश मसाळ यांना निवेदन देण्यात आले.
याआधी अतुल वांदिले यांनी दारोडा येथे शेतकरी मधुकर घवघवे यांची त्यांचा घरी जाऊन भेट घेत सांत्वन केले.
सतत 18 दिवसापासून मुसळधार पाऊस असल्याने सर्व सामन्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.जास्त पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.दोन वेळा पेरणी करून सुद्धा अति पावसाने त्याचे बियाणे वाहत गेले आहे.यातच शेतकरी घवघवें यांचा दोन बैलाचा करंट लागून मृत्यु झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी मधूकर मनोहर घवघवे यांच्या दोन बैल रोड नी जात असताना रोडच्या बाजूला असलेली डीपी च्या वायर ने करंट लागण्याने दोन बैलाचा जागीच मृत्यु झाला.या घटनेने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले.रा. कॉ. पार्टीचे सरचिटणीस अतुल वांदिले यांनी शेतकरी कुटूंबाची सांत्वन करून शासनाकडे आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, यांच्यासह माजी सरपंच प्रशांत घवघवें, मधुकर घवघवें, सुरज साठोने, धनराज लांबट, सोमदास संगतसाहेब, रमेश रघाटाटे, शिवाजी येळने, विकेश जौजाळ, प्रतीक चाफले, किशोर कुमरे, पिटु कारवटकर, किसना घवघवें, अंबादास देवढे, उमेश आत्राम, अनिल तोंडावट, अमोल पडोळे, भोजराज नेहारे, प्रवीण तडस, प्रफुल हुलके आदी उपस्थित होते..