हिंगणघाट शहरात खुलेआम मद्यापन व गांजा शौकीन यांच्यामुळे खेळाडूं त्रस्त

 

हिंगणघाट शहरात खेळाडूंसाठी राखीव असलेले मैदान या ठिकाणी दारू शौकीन, गांजा शौकीन खुल्या मैदानात बसून दारू पितात ,गांजा चा नशा करतात व खाली शिशी हे फेकतात , हिंगणघाट शहरातील टाका ग्राउंड येथे खेळाडू प्रॅक्टिस करण्याकरिता दररोज येतात बऱ्याच खेळाडूंना धावते वेळी फुटलेल्या काचांची इजा देखील झालेली आहे. तसेच काही युवक मुलींना टोमणे मारून टवाळक्या देखील करतात. कोणी लपून व्हिडिओ सुद्धा बनवतात. त्यामुळे प्रॅक्टिस करायला येणाऱ्या युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रेमी युगल सुद्धा या परिसरात येतात .होत असलेल्या प्रकारातून काहीतरी अनुचित व आपल्या शहराला काळीमा फासणारी घटना घडण्याची संभावना आहे. म्हणून आम्ही सर्व खेळाडू आपणास विनंती करतो की येथे होत असलेल्या दारू गांजा मैदानात पिऊन टवाळकी करणाऱ्या युवकांचा बंदोबस्त करावा. या ठिकाणी अंधार होत असल्याने हे प्रकार जास्त घडत आहेत त्यामुळे टाका ग्राऊंडच्या चारही बाजूला लाईट ची व्यवस्था करण्यात आली तर हा प्रकार कमी होण्याची शक्यता आहे. संबंधित निवेदन मा. उपविभागीय अधिकारी ,हिंगणघाट पोलीस निरीक्षक यांना दिले यावेळी शक्ति गर्ल स्पोर्टिंग फुटबॉल क्लब चे शबाना कुरेशी ताशिब शेक, राज भारती, खुशाल कामडी, विशाल मेश्राम, जाबिर कुरेशी, कार्तिक सोनटक्के, निहाल सोनटक्के, अयन अली, रक्षित जामभूडकर, कार्तिक जामभूडकर, शरफराज खान, नावेद शेख , तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महेश मुडे, प्रशांत मेश्राम, निखिल कांबळे, अविनाश धनरेल, अमित रंगारी, प्रफुल मेश्राम उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

Leave a Comment