हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री मा.ना उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केली पाहणी

 

 

 

औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी

ऋषी जुंधारे

आज गोळवाडी येथे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धवजी_ठाकरे_साहेबयांनी हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी माननीय_मुख्यमंत्री_साहेब व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. एकनाथजी_शिंदे_साहेब यांचे स्वागत *आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सरकेले. यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा घेत मा मुख्यमंत्री साहेब यांनी स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. यावेळी *मा मुख्यमंत्री साहेब यांना आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर*यांनी शेतकर्यांच्या वतीने सर्वीस रस्त्यांसाठी निवेदन दिले.
.
.
या महामार्गाच्या आढावा वेळी #मा_मुख्यमंत्री_साहेब यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एलअँडटी कंपनीच्यावतीने समृद्धी महामार्ग पॅकेज 10 या बाबत सविस्तर माहिती घेतली. यामध्ये समृद्धी महामार्गाचा पॅकेज 10 प्रकल्प, प्रकल्पाची 57.90 कि.मी धावपट्टी, सर्व्हिस रोड, छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन, पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदींची सविस्तर तपशीलवार माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे साहेब,
रोहयो मंत्री संदीपान भूमरे साहेब, महसूल राज्यमंत्री अब्दुलजी सत्तार साहेब, आमदार अंबादास दादा दानवे, आ. उदयसिंह राजपूत, आ. संजयजी सिरसाठ, मुख्यमंत्री सचिव मिलिंदजी नार्वेकर साहेब, जिल्हाधिकारी सुनीलजी चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदवले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, उपनगराध्यक्ष साबेरभाई, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पा गलांडे, तालुका प्रमुख सचिन वाणी, मा जि प सदस्य मनाजी पा मिसाळ, शहरप्रमुख राजेंद्र पा साळुंके,उपतालुका प्रमुख महेश पा बुनगे, रणजित पा चव्हाण, हरिभाऊ साळुंके, पारस घाटे, रियाज अकिल शेख, अमीर अली उपस्थित होते.

Leave a Comment