हिवरा आश्रम येथे संविधान दिन साजरा

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या आदेशावरुन मेहकर तालुक्यातील हिवराआश्रम येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.हिवरा आश्रम येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये मा.राजुभाऊ उचित व विजय सरकटे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले व त्यांनी छोटेखानी भाषणामध्ये सांगितले की,२६ नोव्हेंबर
भारतीय “संविधान दिवस..”
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांनी आपल्या रक्ताची शाई करुन शरीराची पर्वा न करता “2 वर्ष 11 महिने 18 दिवस” एवढ्या कालावधीमध्ये “395 कलमे आणि 8 परिशिष्टे” लिहून जगातील सर्वात महान बलशाली राज्यघटना लिहिली.लेखणी तर सर्वांच्याच हातात होती.ताकत तर सर्वांच्याच मनगटात होती.पण,राज्यघटना लिहण्याची ताकत तर फक्त बाबासाहेबांच्याच रक्तात होती.26 नोव्हेंबरला हा दिवस संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो.. यावेळी तथागत फाउंडेशन व तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य राजकुमार उचित बुलडाणा जिल्हा संघटक,विजय सरकटे बुलडाणा जिल्हा युवा अध्यक्ष,विजय कंकाळ हिवरा आश्रम शहर अध्यक्ष,युनुस भाई शहा,रवि जोरावर,सुमित मोरे,सुधीर बोरुडे,अरुन मगरे,अमिन शहा,अनीस शहा,विनोद वानखेडे,संदिप सोनुने आदी कार्यकर्ते उपस्थित होते..!

Leave a Comment