११२ वर फोन करून खोटी माहिती पुरवणाऱ्या इसमा वर गुन्हा दाखल…

सिंदी रेल्वे…. वार्ड नंबर ८ येथील अजय रामभाऊ लोंढेकर त्यांच्या अंगणातील नागोबा मंदिराजवळ मटणाची पिशवी व चिप्स पॅकेट टाकले आहे अशी खोटी तक्रार ११२ वर कॉल करून केल्याने सिंदी पोलीसांनी अजय लोंढेकर विरोधात भा.द.वी. च्या कलम १७७ अनव्ये अदखलपात्र गून्हा नोदविला आहे.

लोंढेकर यांनी ११२ वर कॉल करुन अंगणातील नागोबा मंदिरा समोरच मटणाच्या व चिप्स च्या पिशव्या टाकल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी तक्रार प्राप्त होताच सहायक पोलीस निरीक्षक वंदना सोनूने पोलिस कर्मचाऱ्याना सोबत घेऊन घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता तक्रारीच्या अनुषंगाने अशी कोणतीही वस्तू घटनास्थळावर आढळली नाहीं. सदर घटनास्थळाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांची चौकशी केली असता असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाले.

लोंढेकर यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याने लोकसेवकास खोटी माहिती दिली म्हणून अजय रामभाऊ लंढेकर यांचे विरुद्ध भा.द.वी चे कलम १७७ अनुवये गुन्हाची नोंद करण्यात आली असून या पुढे असा प्रकार पुन्हा घडू नये याकरिता न्यायालयाची परवानगी घेउन पुढील तपास करण्याबाबत साहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी महिती दिली….

Leave a Comment