१४ वर्षाय अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार; नराधमाला अटक

 

यावल – ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

गतीमंद असल्याचा फायदा घेत गावातील नराधमाकडून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना घडली. नराधमाला पोलीसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगी ही गतीमंद असल्याने ती घरीच असते. १३ जुलै रोजी सकाळी मुलीचे कुटुंबाचे सदस्य कामानिमित्त शेतात निघून गेले. दरम्यान, गावातील शांतारा मधनसिंग गायकवाड याने मुलीचा गतीमंद असल्याचा गैर फायदा घेत तिला गावातील बकऱ्यांच्या वाड्यात घेवून गेला. तिथे तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. दुपारी कुटुंबिय घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पीडीतेला घेवून यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नराधम शांतारा गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहे.

Leave a Comment