४० रक्तदात्यांची रक्तदान करुन कै.जोशीना आदरांजली …!

 

कै.शालिग्राम जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सलग दुसऱ्या वर्षी शिबीराचे आयोजन

सिंदी रेल्वे ता.२२ : शहरातील सुपरिचित समाजसेवक तथा शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष कै.शालिग्राम जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जोशी परिवार आणि मित्र मंडळाव्दारे सलग दुसऱ्या वर्षी शनिवारी (ता.२२) ला जैन भवन येथे आयुष्य ब्लड बॅक नागपुर यांच्या सहकार्याने भव्य रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

………कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.लिलाधर पालिवाल हे होते. तर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक वदंना सोनुने या होत्या. साई क्रिडा मंडळाचे अध्यक्ष गंगाधर कलोडे आणि आयुष्य ब्लड बॅक नागपुरच्या संचालिका भांडवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन आणि कै. शालिग्राम जोशी यांच्या प्रतिमेचे पुजन व श्रध्दा सुमन अर्पण करुन करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरानी कै. जोशी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

रक्तदान शिबीराची सुरवात जीवनातील ५१ वे रक्तदान करुन बुलढाणा अर्बन बँकेचे कर्मचारी अतुल बेलखोडे यांनी केली. रक्तदानात विक्रम प्रस्थापित करणारे बेलखोडे यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्याचप्रमाणे याप्रसंगी कार्यतत्पर ठाणेदार म्हणुन आपल्या कार्याची कमी कालावधीत छाप उमटविणार्या वंदना सोनुने यांचा शाल श्रीफळ आणि मोमेंटो देऊन श्रीमती प्रेमाताई शालिग्राम जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबीरात ३० पुरुष आणि १० महीला अशा ४० दात्यानी रक्तदान करुन कै.जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक मोहन सुरकार यांनी केले. उपस्थितांचे आभार आनंद छाजेड यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दुग्रेश जोशी, राजु निनावे,चंपु भन्साली, अनिल बाकडे, बालु सोनटक्के, रमेश वंडाद्रे, बंडु उंबरकर आदीनी परिश्रम घेतले.
रक्तदान करतांना माजी नगरसेवक अमोल बोंगाडे आणि सहकारी

Leave a Comment