८ ग्रामपचांयतीच्या निवडणुकीत ८ सरपंच पद ८ व सदस्य ७८ जागा यापैकी काही जागा बिनविरोध

 

यावल  विकी वानखेडे

यावल तालुक्यातील ८ ग्रामपचांयतीच्या निवडणुकीत ८ सरपंच पद ८ व सदस्य ७८ जागा यापैकी काही जागा बिनविरोध झाल्या असुन आता ७ सरपंच पदा आणि ५२ सदस्य निवडीसाठी ​एकूण ७९.६७ % टक्के मतदान झाले होते या मतदानाची मतमोजणी मंगळवारी येथील तहसील कार्यालय् शांततेत पार पडली. मतमोजणीस सकाळी १० ते १२ वाजेपर्यत ८ टेबलवर करण्यात आली.

सकाळी ९ वाजेपासूनच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीाकंनी शहरात येण्यास सुरवात केली त्यामुळे दिवसभर शहरात यात्रेचे स्वरूप आले होते. तहसील समोरील शेत गर्दिने फुलून गेले होते. विजय उमेदवार मतमोजणी कक्षाबाहेर येताच​ समर्थाकडून जल्लोष होत असे. तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलार आर. के. पवार यांचे मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसिलदार संतोष विंनते, नायब तहसिलदार आर.डी. पाटील , निवडणुक निर्णय अधिकारी हनिफ तडवी, बबीता चौधरी, एस.एल. पाटील, सचिन जगताप, एन.पी वैराळकर, एम. पी. देवरे, शेखर तडवी , ईश्वर कोळी सह कर्मचारी यांनी मतमोजणी प्रक्रीया शांततेत पार पडली. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे उपस्थीती पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

चुंचाळे ग्रामपंचायत वार्ड क्रमांक १ मधील उमेदवार सुपडू रामा पाटील व संजय देविदास पाटील या दोघांना समान मतदान 229 पडले यांचा ईश्वरचिठ्ठीद्वारे काढण्यात आल्या ही ईश्वर चिट्ठी शाहदप खान जाकीर खान , इयत्ता २ री ,वय ८ वर्ष यांच्या हस्ते काढण्यात आली यात संजय देविदास पाटील या उमेदवाराचा विजय झाला…

यावल तालुक्यातील न्हावी प्र यावल या सर्वात मोठी ग्रामपंचायतीवर शिवसेनेची मुसंडी. सरपंच पदावर शिवसेनेचे देवेंद्र भानुदास चोपडे हे २३०० मतांनी विजयी झाले. शिवसेनाच्या विजयी उमेदवारना शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवसेना तालुका संघटक पप्पू जोशी , कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती भानुदास चोपडे , शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष धोबी, शिवसेना आदिवासी तालुका प्रमुख हुसेन तडवी, मयूर धोबी यांच्यासह शिवसेना युवा सेना व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा देऊन जल्लोष केला.

८ ग्रामपंचयतीत सरपंच व सदस्य पदावर विजयी झालेले गावातील उमेदवार –

१ ) कासारखेडे –
सरपंच – नजीमा मुराद तडवी,
सदस्य –
उमेदा तुराब तडवी (बिनविरोध ), रसूल रहेमान तडवी ( बिनविरोध ), दिलीप माधवराव पाटील (बिनविरोध ) , नंदाबाई भास्कर भालेराव ( विजयी ) , अश्विनी रामप्रसाद पाटील ( विजयी ), रमजान नबाब तडवी ( विजयी ), सलीमा रहमान तडवी ( बिनविरोध ).

२ ) चिखली खु. –
सरपंच – सायरा गणेश सोनवणे ( विजयी ),

सदस्य – चंद्रकला देविदास इंगळे ( विजयी ), कोमल पंडित झोपे ( विजयी ) , चारुलता प्रवीण फिरके ( विजयी ) , जितेंद्र दुर्गादास पाटील ( विजयी ) , प्रवीण तुळशीराम फिरके ( विजयी ) ,रजनी केशव पाटील ( विजयी ) ,सोनाली गोविंदा सोनवणे (बिनविरोध ).

३ ) चिखली बु. –
सरपंच – जानकीराम मधुकर पाटील ( विजयी ) ,

सदस्य –
दिलीप आनंदा पाटील (बिनविरोध ), रूपाली सहदेव पाटील (बिनविरोध ), प्रशांत मुरलीधर तायडे (विजयी ), युवराज हुना महाजन (बिनविरोध ), रेखा सिताराम महाजन (बिनविरोध ), मीना शालिक तायडे (बिनविरोध ), शोभा प्रकाश सावळे (बिनविरोध ),

४ ) चितोडा –

सरपंच – अरुण देविदास पाटील (विजयी ),
सदस्य – योगेश वासुदेव भंगाळे (विजयी ), चंद्रकांत सुरेश जंगले (विजयी ).
बिनविरोध सदस्य –
उज्वला संदीप पाटील ,राजू हिरामण कुरकुरे , प्रदीप मेघशाम धांडे, बेबी कडू पाटील, हर्षा गोकुळ पाटील , राधिका पंकज वारके, सिंधू नांदो टोंगळे.

५ ) चुंचाळे –
सरपंच – नौशाद मुबारक तडवी.
विजयी सदस्य -सपना दीपक कोळी ,सरला मधुकर कोळी, संजय देविदास पाटील ( ईश्वर चिठ्ठेद्वारे विजयी ), रहेमान मेहरबान तडवी ,आस्मिन कदीर तडवी , मनोज फकीरा धनगर , बैतूल कलिंदर तडवी , जरीना मजीत तडवी , कुर्बान जाफर तडवी.

६ ) न्हावी प्र यावल –

सरपंच – देवेंद्र भानुदास चोपडे.

विजयी सदस्य –
शोभा शांताराम मोरा, स्वीटी उमेश बेंडाळे ,पिंजारी शेख नदीम शेख आयुब, पिंजारी शेख गफार शेख याकूब, पौर्णिमा सुधाकर पाटील, रूपाली विश्वनाथ तायडे ,रवींद्र रमेश तायडे, यशवंत माधव तळले ,आरजू सरफराज तडवी, हेमांगी चेतन झोपे, मयूर सुनील चौधरी, सविता गिरीश गाजरे ,प्रभाकर पंडित कोळी, योगिता सचिन इंगळे ,नितीन चिंधू इंगळे ,चेतन आनंदा इंगळे, बिनविरोध फातिमा बी रज्जाक तडवी.

७ ) पाडळसे –

सरपंच – गुणवंती सुरज पाटील.
सदस्य विजय – कविता संजय कोळी, नामदेव कडू कोळी, पांडुरंग शामराव कोळी ,सुरेखा सिताराम कोळी, अरुण नेमचंद्र चौधरी, किरण प्रभाकर तायडे ,पल्लवी प्रकाश तायडे ,अवंतिका मनीष नेहते, प्रकाश चिंतामण पाटील, उज्वला रवींद्र पाटील, हेमलता राजेंद्र बऱ्हाटे , सुदेश कडू बाविस्कर, तुषार रामचंद्र भोई, अलका रघुनाथ सोनवणे , बिनविरोध पूनम मनोज पाटील.

८ ) पिळोदे –
बिनविरोध सरपंच – छाया अनिल पाटील.
विजय सदस्य – विद्या जगदीश महाजन, प्रमिला सारंगधर पाटील.
बिनविरोध सदस्य – सुजाता विलास जवरे ,लतिका सुनील जवरे, मयूर दौलत जवरे, धीरज मनोहर चौधरी.

Leave a Comment