Home Breaking News अती धाडस आले अंगावर ,पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता पार करणे बेतले...

अती धाडस आले अंगावर ,पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता पार करणे बेतले जीवावर

 

 

मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण

यवतमाळ: अती धाडस एका तरुणाच्या अंगावर आले आहे . ,पुलावरून पाणी वाहत असताना मोटारसायकलने पूल पार करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे , अर्ध्या रस्त्यात गेल्यावर पुराचा लोंढा आल्याने तो नदी पात्रात वाहून गेला आहे , नकुल जाधव असं या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे .
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील निंबर्डा येथे या भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी दुथडी भरून वाहत होती . अशातच या नदीचे पाणी पुलावरून मोठ्याप्रमाणावर वाहत होते .जीवाची पर्वा न करता नकुल याने जाते धाडस करीत नदीवरील पूल मोटारसायकलने ओलांडण्याचा प्रयत्न केला .पण पाण्याच्या एका मोठ्या लोंढ्याने त्याचे मोटारसायकलवरचे संतुलन बिघडले आणि तो नदी पात्रात वाहून गेला . त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो अद्याप सापडला नाही ,