Home Breaking News अपघातात जखमीना घेऊन जाणाऱ्या सोनाळा पोलीस स्टेशनच्या गाडीचा अपघात

अपघातात जखमीना घेऊन जाणाऱ्या सोनाळा पोलीस स्टेशनच्या गाडीचा अपघात

 

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा बावबीर रोड वर सोनाळा विद्युत वितरण कार्यालय जवळ सोनाळा पोस्टेचे कर्मचारी व मजुर यांच्या दुचाकीची धडक होऊन जखमीना सोनाळा पोलीस ठाण्याची चार चाकी वाहन हे वरवट बकाल मार्गे शेगाव कडे जखमींना घेऊन जात असताना नेकणामपूर फाट्या नजीक रात्री ९ वाजेच्या दरम्यात अचानक रोहिला (हरिण) वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन क्रमांक एम एच २८ ,६३२३ वाहन झाडाला धडक होऊन समोरील बाजूचे टायर व कैची एक्सल तुटल्याने सदर वाहन रस्त्याच्या कडेला ब्रास शेतात घुसल्याने वाहनातील व्यक्ती किळकोळ जखमी झाले परंतु दैव्य बलवंत म्हणुन सोनाळा पो स्टे चे सहाय्यक पो उपनिरिक्षक पवार व ड्रायव्हर सह इतर बालबाल बचावले जीवित हानी झाली नाही सदर वाहनाच्या अपघाताची माहिती सोनाळा, तामगाव पो स्टे ला समजताच घटना स्थळी ठाणेदार श्रीधर गुट्टे , तामगाव पो.स्टे.जमदार माळी, इंगळे पोलीस कर्मचारी सह यांनी धाव घेऊन अपघात ग्रस्त वाहनातील जखमीना उपस्थीत असलेले शिवा खोंड , शफाकत अली , शेख नाजीम , अरुण धर्माळ, वासुदेव म्हसाळ यांच्या सहकार्याने वाहनातुन काढुन तात्काळ रुग्णवाहिका १०८ बोलावून शेगाव ला उपचार करीता पाठविण्यात आले आहे.