अल्पवयीन मुलाला पैसेचे आमीष दाखवुन आरोपीने स्वताच्या घरात नेऊन त्याचेवर अनैसर्गीक कृत्य

0
684

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

तामगाव पोलीसात गुन्हा दाखल
आरोपीस अटक.

संग्रामपुर [ प्रतिनिधि ] तालुक्यातील उमरा पानाचे येथे एका अल्पवयीन मुलाला पैसेचे आमीष दाखवुन आरोपीने स्वताच्या घरात नेऊन त्याचेवर अनैसर्गीक कृत्य केल्याची घटना दि. १४ डिसेंबर च्या दुपारी १२ वाजे दरम्यान घडली असून संबंधीत आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये तामगाव पोस्टेला गुन्हे दाखल करुन तामगाव पोलीसांनी आरोपीला अटक केली. या बाबत प्राप्त माहिती अशी कि तालुक्यातील उमरा पानाचे या गावातील शाळे समोर झाडा खाली खेळत असतांना गावातीलच आरोपी विकी नामक याने पिडीत अल्पवयीन मुलास पैसेचे आमीष दाखवुन स्वताच्या राहत्यात घरात नेऊन अल्पवयीन मुलावर अनैसर्गीक कृत्य केले. पिडीत मुलाच्या नातेवाईकाने फिर्यादी यांनी आरोपीला घडलेल्या प्रकारा विषयी विचारणा केली असता उलट फिर्यादीस शिवीगाळ केली पिडीत मुलाच्या नातेवाईकांनी तामगाव पोस्टेला दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी [ रा उमरा पानाचे ) याच्या विरुद्ध विविध कलम ३७७ , ५०४ भादवि अन्वये गुन्हे दाखल करुन तामगाव पोलीसांनी आरोपीला अटक केली याबाबत तामगाव पोस्टेचे ठाणेदार उलेमाले यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहाय्यक पोलीस उप निरिक्षक श्रीकांत विखे करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here