आरोग्य विभाग झोपेत धक्कादायक प्रकार ,कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला दिल्या मुदत बाह्य औषध गोळ्या .

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

कोरोना बांधित रुग्णाला मुद्दतबाह्य औषध

बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार चक्क कोरोना रुग्णाला मुद्दतबाह्य औषध दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने रुग्णांमध्ये भिती निर्माण झाली आहे, संग्रामपुर तालुक्यातील कोलद येथील एका कोरोना रुग्णाचा आहवाल पाॕझिटिव्ह आल्या नंतर त्या रुग्णाला वा-यावर सोडून दिले .व पाॕझिटिह रुग्णालाच गोळ्या आणण्यासाठी साठी बाहेर पाठवण्यात आले प्रा.आ.केंद्र मधून त्या कोरोना रुग्णाला गोळ्या तर देण्यात आल्या परंतु त्या पण मुद्दतबाह्य गोळ्या देवून पाठवण्यातआले .त्या रुग्णाचे नंतर लक्षात आले की दिलेल्या गोळ्या मुद्दतबाह्य आहेत.त्यामुळे कोरोना व इतर रुग्णामध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जणु काही आरोग्य विभाग रुग्णांचे जीवन मरणाशी खेळ तर नाही ना? ,शासन कोरोना रोखण्यासाठी व रुग्ण बरे होण्यासाठी प्रचार,प्रसार करण्यासाठी व कोरोनाचे आणी इतर आजार बरे होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.तर एकीकडे कोरोना सारख्या आजाराकरीता मुदत बाह्य औषध गोळ्या त्याही सरकारी दवाखान्यातून आरोग्य विभागाकडून दिल्या जातात.ह्या गंभीर बाबीला जबाबदार कोण? वरील बाब उघडकीस आल्याने आता लोकांचा मनात मरणाची भिती निर्माण झाली आहे.झालेल्या प्रकाराची चौकशी होवुन संबधितावर कार्यवाही व्हावी अशी जनतेत चर्चा सुरु आहे,

Leave a Comment