आर्यन खान ड्रग्स प्रकरणात “25 कोटिची” मागणी, व्हिडिओ आला समोर,

0
545

 

SURYA MARATHI NEWS

मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील धक्कादायक वीडियो समोर आला आहे व एक साक्षीदार किरण गोसावीच्या सहकाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.की
या प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोप प्रभाकर साईल यांनी केला आहे. तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटी रुपयांमध्ये डील केल्याचा आरोप केला आहे.

आर्यन खान aryan khan आणि नवाब मलिक navab malik दोन वेगळे विषय – गृहमंत्री

प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करत असल्याचे सांगतात. ते म्हणतात, ”क्रूझवर झालेल्या छापेमारीवेळी ते किरण गोसावीसोबत होते. त्याने सॅम आणि गोसावी नावाच्या व्यक्तीला एनसीबी NCB कार्यालयाजवळ भेटताना पाहिलं. हे प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटी रुपयांमध्ये डील झाली होती. त्यापैकी 8 कोटि समीर वानखेडे सरांना द्यायचे आहे आणि उरलेले आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, असे किरण गोसावी यांनी फोनवर बोलत होते. त्यानंतर एका ठिकाणाहून मला ५० लाख रुपये घ्यायला पाठविले होते. ते पैसे मी त्यांना आणून दिले. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक पिशवी देऊन ती सॅमला द्यायला सांगितली होती. किरण गोसावी (kiran gosavi)स्वतः पत्नीसोबत बाहेर गेले होते.” असे खळबळजनक आरोप या व्हिडिओमधून केला आहे. मात्र, सूर्या मराठी न्यूज़ या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
surya marathi newe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here