प्रकरणात गौडबंगाल असल्याचा संशय…
नांदुरा:-स्वतःच्या मालकीची चार चाकी वाहन मित्रांना घेऊन जात असताना नांदुरा पोलिसांनी ते तपासणीच्या नावाखाली थांबविले आणि नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये ते ठेवायला सांगितले सदर प्रकरणात गाडीमालकाने ही गाडी आपली असून याबाबत काय गुन्हा केला अशी विचारणा केल्यानंतर ती गाडी परत देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली आणि यानंतर ही गाडी त्रयस्थ माणसाला मालकाची संमती न घेता परस्पर दिल्याने या प्रकरणी नांदुरा पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असून सदर प्रकरणात काय गौडबंगाल आहे याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास बरेच काही काळेबेरे उजेडात येईल यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गाडी मालकाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतुन केली आहे..
याबाबत सविस्तर असे की अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याच्या मनात्री येथील रहिवासी अनंत शंकरराव थोरात हे शेगाव येथील सामान्य रुग्णालयात रूग्णवाहीकेवर चालक म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 6 /9/ 2021रोजी श्री थोरात हे आपल्या मित्रांसमवेत गाडी क्रमांक एम एच 28 ए.एन. 2827 या अर्टिका गाडीने शेगाव येथून त्रंबकेश्वरला दर्शनासाठी जात होते नांदुरा शहरात तेथील पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गाडी अडवून गाडीची कागदपत्रे मागितली कागदपत्रे दाखल केल्यानंतर गाडी पोलीस स्टेशन मध्ये लावण्यास त्यांनी बजावले. यानंतर गाडी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर पुन्हा एकदा कागदपत्र व मालकी हक्काबाबत ठाणेदार गावंडे, चौकशी अधिकारी दौंड यांना सर्व कागदपत्रे दाखविले. त्यावेळी ठाणेदार गावंडे यांनी सदर कागदपत्रे मला नको दाखवू गावातील प्रतिष्ठित नागरिक लाला भाऊ यांना दाखविण्यास सुचविले. ठाणेदार ठाणेदार यांचे बोलणे त्यावेळी मला आश्चर्यकारक वाटले माझी स्वतःची गाडी असताना व सर्व कागदपत्रे सोबत असताना गाडी अडविण्याचा उद्देश काय याबद्दल मला शंका आल्याने मी गाडीची कागदपत्रे दिल्यानंतर गाडीची मागणी केली असता संबंधितांनी मला गाडी देण्यास नकार दिला.. यानंतर अनंत थोरात हे निराश होऊन शेगावला परतले.. सदर प्रकाराची माहिती अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांना दिल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री निलेश घोंगे यांच्याशी संपर्क साधून आपण सर्व घटनाक्रम त्यांना कळविला यामुळे निलेश घोंगे यांनी त्यांचे मित्र युवराज देशमुख यांना सोबत घेऊन नांदुरा पोलिस स्टेशन गाठले . संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार देऊन थोरात यांना वाहन पाहिजे असेल तर त्यांनी न्यायालयात जावे परंतु न्यायालयात जाण्यासाठी पोलिसांचे कोणतेही कागदपत्र देण्यास त्यांनी नकार दिला. यानंतर नांदुरा पोलिस स्टेशन मध्ये सदर प्रकरणाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता नांदुरा पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ करून नकार दिला. या प्रकरणात गुरुवारी दिनांक 15 ऑगस्ट रोजी नांदुरा पोलिस स्टेशन मधून सातव साहेब यांचा फोन आला होता व त्यांनी गाडीचा व्यवहार काय आहे असे विचारून मला त्यांनी अपमानजनक वागणूक देऊन तुझ्याविरुद्ध चोरीचा रिपोर्ट आला आहे असे म्हणून माझ्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.. दिनांक 6. 9. 2021 रोजीही या अधिकाऱ्यांनी मला शिवीगाळ करून अपमानीत केले होते. येथे वकिली करू नको अशी मल्लीनाथीही त्यांनी केली. सदर प्रकरणाची तक्रार दिनांक 1/10/2021. रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केल्या नंतर दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी चौकशी अधिकारी दौंड यांचा फोन आल्यानंतर त्यांनी सदर प्रकरणात आपले काहीही स्वारस्य नसून आपण ठाणेदार यांच्या लेखी आदेशाने केले ती सर्व कार्यवाही ठाणेदारांच्या लेखी आदेशाने केल्याने आपण ठाणेदारांशी संपर्क साधावा असे सुचविले. ही गाडी अजूनही गाडीच्या मूळ मालकाला परत मिळालेली नसून पोलिसांनी ती परस्पर दुसऱ्याला दिली असावी किंवा तेच वापरत असावेत अशी शंका येऊ लागली असून या प्रकरणात पोलिसांनी इतके स्वारस्य का दाखवावे याबद्दल आता शंका वाटू लागली आहे सदर प्रकरणाची उच्चाधिकार अधिकारी मार्फत चौकशी करण्याची मागणी श्री थोरात यांनी केली असून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांच्याकडे सदर प्रकरणी चौकशी करावी म्हणून थोरात यांनी नीलेश घोंगे यांच्यामार्फत संपर्क साधल्याची माहिती त्यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.