शेगाव: बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे मानधन थकीत असून एप्रिल ते नोव्हेंबर या दरम्यान चे मानधन रखडले असल्याने त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे साधारणतः महिन्याकाठी एका अभियंत्याला पंधरा हजार रुपये पर्यंतचे मानधन सीएससी कंपनी च्या कडून देण्यात येते प्रति घरकुल 750 रुपये याप्रमाणे अभियंत्यांना मानधनाची रक्कम अदा करण्यात येते परंतु एप्रिल ते नोव्हेंबर या दरम्यान चे मानधन ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना देण्यात आलेले नाही संबंधित कंपनीचे अधिकारी बोरकर यांच्याशी अभियंत्यांनी संपर्क साधून मानधनाची मानधनाची मागणी केली असता त्यांना आज उद्या देऊ अशी टोलवाटोलवी केली जाते शेगाव तालुक्यात गजानन करांगळे राहुल भिसे निखिल गायकवाड या तिघांचे मानधन रखडले असून जिल्ह्यात एकूण 30 जणांचे मानधन रखडले असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच त्यांना कुठलाही महागाई भत्ता वगैरे देण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


