यावल तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे
चुचाळे.बोराळे गावातील पेशंट यांना आता फक्त्त इंधन वर हॉस्पिटल साठी गाड्या मिळणार, कोरोना महामारी मुळे ऍम्ब्युलन्स ची कमतरता भासत आहे, गरजू पेशंट साठी वेळेवर गाडी उपलब्ध व्हावी यासाठी गावातील,
मिरखा नूरखा तडवी यांनी आरोग्य सेवेसाठी हे पाऊल उचलले आहे, सध्या मुंबई महा नगर पालिकेत मिरखा तडवी हे वाहन चालक या पदावर कार्यरत आहेत, तडवी समाजाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी ऍम्ब्युलन्स च्या संचालक मंडळ तसेच प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करतात, गावातील आणी समाजातील चांगल्या कामात त्यांचा नेहमीच सहभाग असतो,
यांचा आदर्श घेऊन प्रत्येक तरूणाने मदतीस बाहेर आले पाहिजे,आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनाच मदतीची गरज आहे मात्र ज्यांच्याने शक्य होईल त्यांनी केली पाहिजे.
या कार्याने गावात मिरखा तडवी यांची लोकांविषयी मदत बघून चर्चेला उधाण आले आहे आणि समाजातील व गावातील सर्वत्र यांचे कौतुक होत आहे.