यावल ,(प्रतिनिधी) विकी वानखेडे
तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सोमवारी पारीत झाला. ग्रामपंचायत कार्यालयात तहसिलदार यांनी घेतलेल्या विशेष सभेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सहित नऊ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजुने मतदान करीत ९ विरूध्द एक असा प्रस्ताव पारित झाला.
चुंचाळे ता. यावल येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील या तीन वर्षापूर्वी डिसेंबर २०१७ मध्ये सरपंच पदावर विराजमान झाल्या होत्या. तर गेल्या काही महिन्यापासून सरपंच पाटील या उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करत नाहीये म्हणून ३१ मे रोजी येथील तहसील कार्यालयात त्यांच्या विरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता तेव्हा या प्रस्तावावर सोमवारी तहसिलदार महेश पवार साहेब यांनी चुंचाळे ग्रामपंचायतीत सायंकाळी ४ वाजेला विशेष सभा घेण्यात आली या सभेत सरपंच यांच्या विरूध्द उपसरपंच नाजिमा अन्वदर तडवी सह सुकलाल यशवंत पाटील, अनिल पंडीत कोळी, अरमान मनवर तडवी, दगडू किताब तडवी, शारदा सुधाकर चौधरी, नवशाद सायबु तडवी, जयनूर संजय तडवी, व सिंधुबाई संजय पाटील यांनी मतदान केले व ९ विरूध्द एक असा अविश्वास प्रस्ताप पारीत झाला आहे.-पुर्ण—फोटो आहे







