यावल तालुका प्रतिनिधी। विकी वानखेडे
चुंचाळे ता.यावल येथे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री समर्थ वासुदेव बाबा दरबारात सालाबादा प्रमाणे ह्या ही वर्षी गुरुपोर्णीमे निमीत्त महाप्रसाधाचे आयोजन केले होते,
सकाळी पाचला मुर्ती स्थान सहाला मारोती अभीषेक बाराला आरती त्यानंतर दिवसभर महा प्रसादाचे वाटप करण्यात आले व दिवसभर भजन भारुडे सुरु होते
कोरोनाचे काटेकोरपणे पालन करीत भाविकांनी घेतले समाधी स्थळांचे दर्शन घेतले व नवस फेडले दर्शन घेण्यासाठी गुजरात .कर्नाटक एम पी व महाराष्ट्रातील अनेक जिल्हयातून भाविक व शिष्य मदीरात आले होते त्यानंतर सध्याकाळी पाचला गावात भक्तीमय वातावरणात पावली खेळत पालखीची मीरवणुक काढण्यात आली होती पालखीचे पुजन येथील नगराज महाराज यांनी केले यावेळी वासुदेव बाबांना त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी साकडे घातले
पालखिची परपंराही ५० वर्षापासून आजपर्यंत आविरत सुरुच आहे पालखी मध्ये सर्व गावातील ग्रामस्थ व शिष्यगण सहभागी होउन कोरोना नियमाचे पालन करुण रात्री ८ वाजता दहिहंडी साध्या पध्दती ने फोडण्यात आली दही हंडीचे पुजन देखील नगराज महाराज यांनी केले दहिहंडी आणि विशेष म्हणजे या वर्षी भारत मातेचा सुपुत आर्मी चे जवान गोपाळ पाटील यांनी दहिहंडी फोडून वेगळीच मिसाल त्यांनी करून दाखवली आहे, यावर्षी चुंचाळे येथील इडीयन आर्मीचे जवान गोपाळ ज्ञानेश्वर पाटील यांनी फोडली दहिहंडी फोडत असतांना भारत माता की जय या जयघोष करण्यात आला होता
कार्यक्रम यशस्वीते साठी चुंचाळे बोराळे व वासुदेव बाबा भजनी मंडळ यांनी परीश्रम घेतले







