छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या देशव्यापी काव्यस्पर्धेचा निकाल जाहीर

0
1125

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड-एक वादळ आयोजित राज्यस्तरीय ‘काव्यस्पर्धा’ या ऑनलाईन पद्धतीने समुहाच्या माध्यमातून काव्य स्पर्धेचे आयोजन शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी दिनांक १९फेब्रुवारीला करण्यात आले होते.या स्पर्धेचा निकाल छत्रपती राजाराम महाराज जयंती दिनी समुहाच्या वतीने जाहीर केला.ही स्पर्धा काव्यस्पर्धा १व २या दोन्ही समुहात पार पडली.यामध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातून रचना प्राप्त झाल्या.या रचनांचे परिक्षण सुप्रसिद्ध कवयित्री.रिया पवार (मुंबई ) आणि सुप्रसिद्ध गझलकार आनंद देवगडे (यवतमाळ ) यांनी केले.या स्पर्धेचे आयोजन दोन समुहात झाल्यामुळे दोन्ही समुहातुन प्रशिक्षकांनी दिलेत.काव्यस्पर्धा समुह १मधुन प्रथम क्रमांक नंदकिशोर कदम, द्वितीय क्रमांक वसुधा नाईक(पुणे), तृतीय क्रमांक प्रशांत बागुल व.चतुर्थ क्रमांक प्रितम कुमार देवतळे, ओंकार राठोड,व सांगोला तालुक्यातील गौडवाडी गावचा तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील इंजिनेरिंग कॉलेज सांगलीचा विध्यार्थी कु.तुषार पोपट गुळीग(TY.B.TECH)यांना मिळाला.तसेच काव्यस्पर्धा समुह २ मध्ये सर्वोत्कृष्ट रामदास गायधने, उत्कृष्ट रझिया इस्माईल जमादार, प्रथम वर्षा मेंढे, व्दितीय संजय तांबे, तृतीय वर्षा फटकाळे वराडे व प्रोत्साहनपर गणेश निकम, राजश्री मराठे,भारती तिडके, निलिमा नरके ,अमित वीर,सौ.सुनिता कपाळे,सौ.करुणा कंद,सौ.प्रतिमा काळे, वैशाली शंकर यांनी पटकाविलेत.
दोनही प्रशिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेचे आयोजन समुहप्रमुख काव्यभुषण कवी.विशाल इंगोले ( अजातशत्रु ),राहुल गजभिये, तसेच संकलन कवी.अमित मंदा अनिल,कवयित्री.आम्रपाली घाडगे,कवी.बादल जोगे,योग काळे, तेजस्विनी खेडकर व ग्राफिक्स अनिकेत कुहिरे,ओजस केदार यांनी केले.सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रमाणपत्र वितरित करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती व छत्रपती राजाराम महाराज जयंती
काव्यस्पर्धेच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.अशी माहिती कवी.अजातशत्रु व कवी.अमित अनिल मंदा यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here