Home Breaking News जयस्तंभ चौक येथील हिरोळे पेट्रोल पंपाजवळील जागा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा...

जयस्तंभ चौक येथील हिरोळे पेट्रोल पंपाजवळील जागा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतूळा तथा भव्य स्मारक उभारण्यासाठी नगर परिषदेमध्ये बैठक बोलावून स्मारकाच्या ठराव सगळे समोर पारित करावा ! …नगरसेविका राणी बी शेख बबलू कुरेशी यांची निवेदनाद्वारे नगर परिषदेकडे मागणी !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा व भव्य स्मारक उभारण्यासाठी सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष बाबा खरात यांनी गेल्या तीन दिवसापासून हिरोळे पेट्रोल पंपाजवळील जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी व स्मारकासाठी देण्यात यावी या संदर्भामध्ये नगरपरिषदे समोर उपोषण सुरु केले आहे ‘तथापि जवळपास 19 वॉर्डातील नागरिकांनी जयस्तंभ चौक येथील पेट्रोल पंपाजवळ च्या जागेची मागणी तसेच विनंती अर्ज नगर प्रशासनास दिल्यानंतर सुद्धा त्यावर नगर प्रशासनाने कुठल्याही प्रकारची उत्तर न दिल्यामुळे दिनांक 30 मार्चपासून श्री आशिष खरात सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांना बेमुदत उपोषण करावे लागते ही नगर प्रशासनासाठी शोकांतिका असून मुख्य अधिकारी व नगराध्यक्ष यांनी तात्काळ विशेष सभा आयोजित करून उपोषणकर्त्यांची रास्त असलेल्या मागणीचा नगरसेवकांच्या सह्यानिशी ठराव पारित करून पारित झालेल्या ठरावावर नगरपालिका कायदा 1965 नुसार टिपणी लिहून उपोषणकर्त्यांना तथा नगर प्रशासनास प्राप्त झालेल्या अर्जानुसार प्रत्येकाला लेखी स्वरूपात उत्तर द्यावे अशी मागणी राणी बी शेख लाल उर्फ बबलू कुरेशी सभापती महिला व बालकल्याण समिती तथा नगरसेविका वार्ड क्रमांक 3 यांनी दिनांक एक एप्रिल रोजी नगर परिषद बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे !जर ठराव पारित न झाल्यास आंदोलनाची भूमिका माझ्यासारख्या नगरसेवकाला घ्यावी लागेल व होणाऱ्या परिणामास मुख्याधिकारी व नगराध्यक्ष जबाबदार राहील असा इशारा यावेळी शेवटी नगरसेविका राणी बी शेख लाल उर्फ बबलू कृषी यांनी दिला आहे !