गजानन सोनटक्के जळगाव जा
आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बुलडाणा वन विभागातील 2 वन कर्मचाऱ्यांना बुलडाणा उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी निलंबित केल्याने वन विभागात खळबळ माजली आहे. निलंबित करण्यात आलेल्या वन कर्मचाऱ्यांमध्ये वनपाल सलीम खान गुलशेर खान व वनरक्षक गजानन रमेश सोळंके यांचा समावेश आहे.बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातून सातपुडा पर्वत रांगा जात आहे. या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन संपदा असल्याने येथे वनसंपत्तीची तस्करी ही मोठ्या प्रमाणात होत असते. जळगाव जामोद वनपरिक्षेत्र नेहमी चर्चेत राहते. वनपाल सलीम खान यांच्या कडे जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी पदाचा प्रभार असतांना त्यांच्या कार्यक्षेत्रात दोन डांबरी रस्ते वन विभागाच्या जमिनीतून करण्यात आले व त्यामुळे वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ही बाबत त्यांनी वरिष्ठांची दिशाभूल केली तसेच 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत रोपांचा पुरवठा न केल्याने लागवड करण्यात आली नाही व त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,तसेच जळगाव जामोद परिक्षेत्रात डिंकाचा अवैध व्यवसाय चालत असून त्यास सलीम खान हे जबाबदार असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुंवरदेव बीट क्रमांक 1 मध्ये कार्यरत वनरक्षक गजानन रमेश सोळंके यांच्या कार्यक्षेत्रात तब्बल 14 हेक्टर वनक्षेत्र जळून 11 हजार 550 पन्नास रुपयांची वन संपत्तीचे नुकसान झाले. या आगीच्या वेळी वनरक्षक गजानन सोळंके हे गैरहजर होते व त्यांच्या निष्काळजी पणामुळे वन क्षेत्रात आग लागून वनसंपदेचे नुकसान झाले . अशा कारणामुळे वनपाल सलीम खान व वनरक्षक गजानन सोळंके यांना बुलडाणा डीएफओ अक्षय गजभिये यांनी निलंबित केले आहे.