सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
सिंदखेडराजा तालुक्यामध्ये बीपीएल आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून माफक दराने ,गहू ,तांदूळ, ज्वारी, मका , या व इतर धान्याचा पुरवठा केला जात असतो ‘सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोरोना च्या संकट काळामध्ये,शिधा पत्रिकाधारकांना गोरगरिबांना, लॉक डाऊन मध्ये माफक दरामध्ये रेशन दुकानदाराकडून मिळणारे धान्य हे आधार वाटत असते ‘ज्याची संध्याकाळची ही भाकरीसाठी आटापिटा असते अशा गरजू लोकांना हे धान्य उपयुक्त असते ‘परंतु शासनाने रेशनवरील धान्य देताना जे धान्य जनावरेही खाऊ शकत नाही अशी धान्य म्हणजेच मका व निकृष्ट दर्जाची ज्वारी शिधापत्रिका धारकांच्या व गोरगरीब जनतेच्या माथी मारत आहेत ‘त्यामुळे ज्वारी व मका घेऊन करायचे तरी काय ?हा प्रश्न जनतेसमोर पडला आहे ‘स्वस्त धान्य दुकानदाराला जो शासनाने जो जो माल पाठवला तोच माल त्यांना वितरित करावा लागतो ‘माणसं ही जनावराच्या बरोबरीत आहेत काय असा सवालही महिला विचारताना दिसत आहेत ‘ कोरोनाच्या या संकट काळामध्ये अनेक लोकांचा रोजगार गेला आहे आणि ग्रामीण भागातील लोकांचे पोट हे रेशनचे धान्य वरच असते ‘म्हणून दिलेली निकृष्ट दर्जाची मका व ज्वारी हे प्रशासनातील अधिकारी सुद्धा खातील का ‘ ? कारण जनावर ही अशा धान्यांना तोंड लावू शकत नाहीत अशी ही मका व ज्वारी गोरगरिबांच्या माथी मारण्यात येत आहे तरी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन धान्य तपासून चांगले धान्यच राशन धारकांना वितरित करावी अशी अपेक्षा लोक व्यक्त करीत आहेत ‘