झीलच्या एमबीए विधार्थ्यांचे आंतरराष्टीय प्रोजेक्ट मध्ये उत्तुंग यश

0
299

 

झीलच्या एमबीए मध्ये शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्टीय प्रोजेक्ट मध्ये उतुंग यश संपादन केल्याबदल नुकताच या गुणवंत विधार्थ्यानाचा सत्कार करण्यात आला. ह्या प्रोजेक्ट मध्ये विध्यार्थ्यानी ऑनलाईन गूगल क्लासरूम च्या माध्यमातून पूर्ण केला.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.पराग काळकर (अधिष्ठाता ,वाणिज्य व व्यवस्थापन शाखा,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ),श्री रोहन सलगलकर,(व्यवस्थापकीय संचालक,अविरा इनसाइट्स, पुणे), श्री जयेश काटकर (सचिव, झील एजुकेशन सोसायटी,पुणे), श्री प्रदीप खांदवे (कार्यकारी संचालक,झील एजुकेशन सोसायटी,पुणे ) प्रा.उद्धव शिद (डायरेक्टर ऍडमिशन अँड अकॅडेमिकस ,झील एजुकेशन सोसायटी,पुणे ) तसेच डॉ.अश्विनी सोवनी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ.अश्विनी सोवनी यांनी नुसनतारा प्रोजेक्टची माहिती दिली.

यावेळी प्रा.जयेश काटकर यांनी या यशाबद्दल विधार्थ्यांचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ.पराग काळकर यांनी प्रॅक्टिकल शिक्षण हि काळाची गरज आहे तरी विध्यार्थ्यानी अशा प्रोजेक्टच्या माध्यमातून कौशल विकसित करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

रोहन सलगरकर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ऑनलाईन शिक्षणाचा वापर हा समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तसेच बदलण्याचा स्वीकार करण्यासाठी तसेच जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

झील एज्युकेशन सोसायटीच्या एमबीएच्या प्रथम वर्षातील विधार्थांची नुसनतारा या इंटरनॅशनल प्रोजेक्ट मध्ये भाग घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. या इंटरनॅशनल प्रोजेक्ट साठी झील एज्युकेशन सोसायटीतील एमबीए प्रथमवर्षात शिकत असलेल्या १८ विधार्थ्यांची निवड झाली होती.

सदरील प्रोजेक्टचा कालावधी हा २५ मार्च २०२१ ते १० जुन २०२१ एवढा होता. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना एआयबीपीएम या नामांकित संस्थेकडून “नुसनतारा प्रोजेक्ट” चे सर्टिफिकेट पण मिळाले आहेत.या प्रोजेक्ट मुळे विद्यार्थ्यांना जगभरातील १५ विद्यापीठातील विधार्थ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
सदर प्रोजेक्ट विध्यार्थ्यानी प्रा.डॉ.ऋषिकेश काकांडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला.

या प्रोजेक्ट मध्ये गीता टिळेकर, श्रद्धा विसपुते, विवेक उभे, विनया मारणे, गौरी भगत, शुभम जोशी, सायली दडवे, ऋषिकेश जंगम, रफीक़ मुलानी, मयूर कोल्हे, तन्वी धुरी, केल्विन सिबाचीनं, गौरी गायकवाड, अश्विन कांबळे, आकांक्षा रोकडे, आकांक्षा गाडे,विकी कामठे,अर्चना भागात या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या सर्व विद्यार्थ्यांनी जगभरातील १५ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थींसोबत काम करून हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर रिसर्च करून रिसर्च पेपर सादर केला आहे. उत्तम अशा रिसर्च पेपर ला स्कॉपस इंडेक्सड जर्नल्स मध्ये प्रकाशनाची संधी दिली जाणार आहे.तसेच सहभागी विद्यार्थ्यांना इंडोनेशिया आणि इतर अनेक देशात इंटर्नरशीप ची संधी सुद्धा मिळणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी,प्रा.विक्रांत नांगरे,प्रा.भावना खोत,प्रा.पांडुरंग पाटील,प्रा.धर्मेंद्र सिंग,प्रा.एकता तलवार आणि डॉ.आशिष व्यास यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here