Home जळगाव डॉ . मयुर पाटील सायन मुंबईहुन शासकीय वैद्यकीय विद्यालयातुन एमबीबीएसच्या पदवी परिक्षेत...

डॉ . मयुर पाटील सायन मुंबईहुन शासकीय वैद्यकीय विद्यालयातुन एमबीबीएसच्या पदवी परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

पारगाव येथील राहणारे डॉ.मयुर राजेश पाटील हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सायन मुंबई येथून एमबीबीएस पदवीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ .मयुर पाटील हे पारगाव तालुका चोपडा येथील जिल्हा परिषद शाळेततील शिक्षक राजेश उत्तमराव पाटील यांचे चिरंजीव असून विरावली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड .देवकांत पाटील यावलयांचे चुलतबंधू आहेत. पाटील हे एमबीबीएसच्या परिश्रेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने राष्ट्रवादीचे माजी मंत्री अरुणभाई गुजराती यांनी त्याचे अभिनंदन केले असून, एकनाथ पाटील ,योगेश सनेर ,राजेंद्र साळुंखे, व विरावली गावातील मान्यवरांनी त्यास भावी वाटचालीस शुभेच्छा दिले आहेत .