शेगाव: वाढदिवसाचा जल्लोष साजरा करण्यासाठी शेगांव शहरातील शिवनेरी चौक येथील रहीवाशी देवराज रघुनाथ साहु वय ४६ यांनी काही दिवसांपुर्वी वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्या प्रकरणी तलवार जप्त करुन आरोपी यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत शेगांव शहर पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजताच्या दरम्यान आरोपी देवराज रघुनाथ साहू वय ४६ वर्ष यांनी काही दिवसांपूर्वी वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानुसार बालाजी फास्ट फुडचे चायनीज दुकान गांधी चौक या ठिकाणी शहर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली असता त्याच्या ताब्यातून २ हजार रुपये किंमतीची विनापरवाना एक लोखंडी तलवार मिळून आली. यावरून तलवार जप्त करून आरोपी यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नरेश तायडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कलम ४,२५ शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ हे करीत आहेत.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


