दुचाकी मध्ये पदर अडकून महिलेचा मृत्यू

0
1352

 

गजानन सोनटक्के

जळगाव जामोद साडीचा पदर दुचाकीच्या मागील चाकात अडकून पडल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना निमखेडी (ता. जळगाव जामोद) फाट्याजवळ आज, 17 डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

सूत्रांच्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील मेंढामारी येथील संतोष रमेश चव्हाण (23) याचे लग्न मागील वर्षी तालुक्यातील भिंगारा येथील राणीबाई हिच्याशी झाले होते. दोघे पती-पत्नी दोन दिवसांपूर्वी नातेवाईकाकडे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी भिंगारा येथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आज परत येत असताना निमखेडी फाट्याजवळ राणीबाईच्या साडीचा पदर मोटरसायकलच्या मागील चाकात अडकला. त्यामुळे राणीबाईचा तोल जाऊन ती जमिनीवर पडली. यात तिच्या डोक्याला मार लागला. गंभीर जखमी अवस्थेत तिला जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. प्राथमिक तपास पीएसआय सचिन वाकडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत यांनी केला. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशन करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here