सूनगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकांचे वाजले बिगुल… पदाधिकारी कार्यकर्ते लागले कामाला…

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

तालुका जळगाव जामोद येथील सूनगाव ग्रामपंचायत मोठी आहे येथे सदस्य संख्या 17 आहे ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कालावधी संपल्याने नव्याने होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार व त्याचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. येत्या जानेवारी 2021 मध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम निर्वाचन विभागाने जाहीर केला असून आता निवडणुकीला वेग आला आहे. त्याकरिता नामनिर्देशन अर्ज दाखल 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर तर अर्ज छाननी 31 डिसेंबर व 4 जानेवारी रोजी अर्ज मागे घेणे व त्याच दिवशी कायम उमेदवार यांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. इच्छुक निवडणूक लढणाऱ्याची यादी प्रसिद्ध करणे तर 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. ग्राम तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यामुळे सूनगाव येथील इच्छुक उमेदवार पदाधिकारी. कार्यकर्ते कामाला लागले असून गावांत बैठका घेणे सुरू केले आहे. निवडणुकीसाठी सदस्य पदाकरिता योग्य उमेदवाराची चाचपणी करीत आहेत. सूनगाव येथे महाविकास आघाडी व भाजप यांच्या पुढे एकमेकांचं आव्हान आहे पदाधिकारी आपल्यालाच बहुमत कसे मिळेल ह्यासाठी प्रयत्न करीत असून कामाला लागले आहेत. निवडणूक जसजशी जवळ येणार तसे सर्व उमेदवार लोकांना रामराम ठोकणार व मला निवडून द्या व निवडून आल्यावर वार्ड मधले मी कामे करणार असे आश्वासन देणार उमेदवाराचे मुख्य बोल. नाल्या दुरुस्त करणार. पाणी देणार. रस्ते देणार. खरी हकीकत बघितली तर सूनगाव येथील हे सर्व कामे अजून पण झालेले नाहीत. सूनगाव येथील सर्व जनतेची अपेक्षा आहे की. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा सरपंच व सदस्य झाल्यावर सूनगाव गावाचा विकास झाला पाहिजे हे लोकांचे मत आहे…

Leave a Comment