नायगाव येथील अल्पवयीन मुलाने केली गुरांच्या गोठयात गळफास घेवुन आत्महत्या अक्समात मृत्युची झाली नोंद

0
566

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील नायगाव येथे एका अल्पवयीन मुलांने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली असुन , यावल पोलीसात याबाबत अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सुजल रमण तडवी वय१६ वर्ष राहणार नायगाव तालुका यावल या अल्पवयीन मुलाने दिनांक २५ जुन रोजी दुपारी ४वाजेच्या सुमारास आपल्या गुरांच्या गोठयात (वाडयात)पत्रांच्या शेडच्या अँगलला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . या घटनेची खबर मयताचे वडील रमण रूबाब तडवी वय४३ वर्ष यांनी खबर दिल्याने पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे . मयत सुजल तडवी याच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . अल्पयीन सुजल तडवी ने आत्महत्याका केली हे अद्याप स्पष्ठ झाले नसुन ,रागाच्या भरात ही त्यांने हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here