Home Breaking News पदविका डिप्लोमा धारकांना संपवण्याचा कट व महाराष्ट्र कौन्सिलिंग यांनी लावलेले निर्बंध तातडीने...

पदविका डिप्लोमा धारकांना संपवण्याचा कट व महाराष्ट्र कौन्सिलिंग यांनी लावलेले निर्बंध तातडीने स्थगित करण्यात यावा तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील.

407

 

 

 

महाराष्ट्र राज्य पशु सेवादाता संघटना तालुका संग्रामपुर कार्यकारणी मंडळ जिल्हा बुलढाणा

पशुधन पदविकाधारकांना कायमस्वरूपी संपवण्याचा कट महाराष्ट्र काउंसलिंग यांनी रचलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा जिल्हा परिषद मध्ये पर्यवेक्षक श्रेणी 2 दवाखाना येथील पद भरतात आणि शासनच यांना बोगस डॉक्‍टर म्हणतात यामध्ये शासनाचा प्रोटोकॉल चुकत आहे. वेळेस पदविका धारकांनी शासनास मदत केलेली आहे उदाहरणार्थ लसीकरण बिल्ले टोचणे कृत्रिम रेतन पशु जनगणना इत्यादी मदत करत आहे. परंतु शासनाने पदविका धारकाची पिडवणुक करून बोगस डॉक्टर म्हणून आमचे अस्तित्व कायमचे मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.
आमचे पशुधन पदविकाधारक हे शेतकऱ्याच्या दारावर व शेतापर्यंत पशु सेवा पुरवितात म्हणून शेतकऱ्याचे पशुधन जिवंत आहे. आज भारत वर्षांमध्ये शंकर जनावराची पैदास कुत्रिम रेतन द्वारे तयार झाले आहे. याचे स्वयंपूर्ण श्रेय पदविका धारकांना जाते B.V.S.C /L.D.O हे डॉक्टर फक्त कागद काळे करणे आणि लाखो रुपयाचा पगार घेणार पुरताच मर्यादित आहे म्हणून आम्ही काम बंद संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू केले आहे.
संपाचे उद्देश काय हे शासनाकडे मागणी
1) पदवीकाधारक यांचे बेरोजगारी प्रमाण वाढत असल्याकारणाने विविध जागी जसे शासकीय विभागात रोजगारी च्या संधी उपलब्ध करा.
२) महाराष्ट्रात भारतीय पशु वैद्यकीय परिषद अधिनियम १९८४ कायदा रद्द करा.
३) पशुसंवर्धन पदविका धारक व्यक्तींना आरोग्य खात्यातील नर्सिंग प्रमाणे नोंदणीकृत करण्यात यावे.
४) पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक पदावर पदविका धारकाचे पद भरण्यात यावी.
५) पशुसंवर्धन पदविकाधारक बेरोजगार युवकांना शासनाने किमान १० लाख रुपयांचे कर्ज पशुपालन किंवा व्यवसाय करीता उपलब्ध करून द्यावे.