आळंदीत आयकाॅन क्लासेसच्या वतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

 

आळंदी : कोरोनाच्या महामारीत सर्वच पालक आर्थिक अडचणीत सापडले होते याची जाणीव ठेवून मुलांच्या भविष्यासाठी आयकाॅन क्लासेस चे संचालक प्रा.हरीश जगताप सर, नगरसेवक सचिन गिलबिले व मा.नगरसेवक दिनेश घुले यांच्या सौजन्याने आळंदी शहरातील आठवी, नववी, दहावी व अकरावीच्या मुलांसाठी मोफत ॲानलाईन क्लासेस सुरू केले होते. त्यात इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवार १६ जुलै रोजी लागला. त्यामध्ये समृध्दी आंधळे व स्नेहल गाडेकर या विद्यार्थिनींनी गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. त्यांचा आयकॉन क्लासेस च्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ११,१११ रुपये बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला,तसेच ९७ पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रा.हरीश जगताप सर यांनी कठीण परिश्रम, सातत्य, संघर्ष, त्यातून मिळणारे यश, परिवाराची साथ व गुरूजनांचे मार्गदर्शन याविषयी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला नगरसेवक सचिन गिलबिले, मा.नगरसेवक दिनेश घुले, मा.नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, नगरसेविका शैला तापकीर, शहरप्रमुख अविनाश तापकीर, राहूल सोमवंशी, विपुल तापकीर, रामभाऊ कांबळे, उमेश गिलबिले, भाऊसाहेब कोळेकर, प्रशांत जगताप, वैभव तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Comment