पि. राजा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-
पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे दबंग ठाणेदार सचिन चव्हाण यांना नुकताच जिल्हा पोलिस प्रशासन यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी म्हणून सन्मानित करण्यात आले. या मध्ये जिल्हातील मोजक्याच पोलिस अधिकारी यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. या मध्ये पिपळगांव च्या पोलिस स्टेशन चा नंबर आहे. खामगाव उपविभाग ग्रामीण भागांमध्ये दरोडेखोर गुन्ह्यांमध्ये आरोपी हे पद्धतशीररीत्या लोकांना गंडवून नकली सोने खरे भासवुन लोकांना लाखो रुपयांचा चुना लावून त्यांना मारहाण करत लुटत असायचे अशी हि टोळी खामगाव ग्रामीण भागामध्ये सक्रिय झालेली होती आणि या टोळी ला जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नष्ट करण्यात आले. सदर ग्रामीण भागामध्ये या लूटमार करणाऱ्या टोळी ला पायबंद घालने महत्त्वाचे असल्यामुळे सहा मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक चावरिया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव विभागात विशेष कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आले, त्यामध्ये नियोजन बद्धरीत्या कोम्बिग ऑपरेशन करण्यात येऊन अत्यंत धाडसाने शस्त्रसज्ज असलेले एकूण २५ आरोपी पकडण्यात आले होते. या कारवाईमुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासन अत्यंत दक्ष काम करत असून कर्तव्यदक्ष असलेले जिल्ह्यामध्ये पोलिस प्रशासन दिसुन आले होते. या कारवाईमध्ये पिंपळगाव राजा चे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांना गौरविण्यात आले. या सन्मानाने पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या गौरव मध्ये यशाचा तुरा हा प्राप्त झाल्या मुळे पोलिस स्टेशनचे कर्मचारी आनंदित असून परिसरात पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.