Home Breaking News पैशाच्या वादातून चारचाकी वाहन अंगावर घालून शिवीगाळ

पैशाच्या वादातून चारचाकी वाहन अंगावर घालून शिवीगाळ

284

 

नांदुरा: (प्रफुल्ल बिचारे)

मॉर्निंग वॉकला गेलेल्या ४६ वर्षीय इसमाच्या अंगावर पैशाच्या वादातून चारचाकी वाहन घालून शिवीगाळ करीत खिशातील १२०० रुपये काढून घेतल्याची घटना लोणवडी ते माळेगाव गोंड फाट्यादरम्यान शंकर सोळंके यांच्या शेतामध्ये १७ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडली.
लोणवडी येथील कैलास महादेव सातव यांनी नांदुरा पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये लोणवडी ते माळेगाव फाट्यादरम्यान सकाळी पायी फिरतअसताना आरोपी ज्ञानेश्वर जनार्दन गोंड, रा. माळेगाव गोंड यांनी त्यांची चारचाकी गाडी अंगावर घातल्याने खाली पडलो, तसेच रस्त्याच्या खाली शेतात नेऊन माझे ५ लाख रुपये दे, नाही तर गायब करून टाकीन, असे म्हणत शिवीगाळ केली. खिशातील १२०० रुपये काढून घेतले. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपीविरोधात भादंविच्या कलम ३९४ अन्वये गुन्हा नोंदविला. याबाबत अधिक तपास नांदुरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार करीत आहेत.